My First Short Film: पूर्ण सुट्टी


My Musings / Tuesday, April 12th, 2016

‘पूर्ण सुट्टी’ ही माझी पहिली short फिल्म. मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात DCS ला शिकत असताना बनवली. कविता महाजन ह्यांच्या ‘पूर्ण सुट्टी’ ह्या लघुतम कथेवर ही फिल्म आधारित आहे. एखाद्या साहित्यकृतीवर फिल्म बनवणे हे काही सोप्पे नाही हे मला ही फिल्म बनवताना प्रकर्षाने जाणवले. तरी हे माध्यमांतर जितके अवघड होते तितकेच ते करताना मजा देखील आली.

एका वर्षापूर्वी बनवलेली ही फिल्म आज मला परत शूट किंवा एडीट करायला मिळाली तर ती ह्या मूळ कृतीपेक्षा वेगळी असेल ह्यात शंका नाही. पण विद्यार्थीदशेत केलेल्या ह्या फिल्मच्या प्रवासात मी अनेक गोष्टी मी शिकले आणि त्या आठवणी मला जशाच्या तशा जपून ठेवायला आवडेल. त्यामुळे YouTube आणि ह्या ब्लॉगच्या माध्यमातून ही फिल्म तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा छोटा प्रयत्न.

………………………………………………………………………………..

मूळ कथेची लिंक

लघुतमकथा ६ : पूर्ण सुट्टी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *